Slider Image
Slider Image

गावाविषयी माहिती

खेडलेझुंगे  हे महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील एक प्रभू श्री.राम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.खेडलेझुंगे  गावात दक्षिणमुखी हनुमानाची १११फुट उंच मूर्ती आहे व जुने श्रीराम मंदिर आहे .तसेच हनुमान मूर्ती व संत वन संत तुकाराम बाबा संस्थान चे मंदिर आहे . हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३६२०  आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा  १, अंगणवाडी केंद्रे ४ व व्यायामशाळा १,सभामंडप-२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच ८ मंदिरे, सामुदायिक सभागृह,  सार्वजनिक विहिरी संत वन  तुकाराम बाबा निवासस्थान मंदिर अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून ऊस, द्राक्ष, कांदा, सोयाबीन व मका ही प्रमुख पिके घेतली जातात. द्राक्ष  ऊस कांदा या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

खेडलेझुंगे  ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनगाव गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. 
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ११ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. 

खेडलेझुंगे गाव आज निफाड तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

खेडलेझुंगे हे गाव निफाड तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे २०  कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ९०३.६  हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण ७०४ कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३६२०  आहे.

गावाचा भौगोलिक विस्तार प्रामुख्याने सपाट प्रदेशात असून शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात आहे.तसेच गावालगतच  गोदावरी नदी असून  गावाचे  दक्षिण बाजू ला १.५ कि अंतरावर २ पाट जात असून रोटेशन मध्ये ज्यामुळे पिकांना पाणीपुरवठा होतो . येथे हवामान उष्णकटिबंधीय आहे; उन्हाळ्यात तापमान साधारणतः ३९°से. पर्यंत जाते, तर हिवाळ्यात १५°से. पर्यंत खाली येते. पावसाळ्यात सरासरी ६० ते ७० से.मी. पर्जन्यवृष्टी होते.

खेडलेझुंगे  गाव द्राक्ष कांदा ऊस उत्पादनासाठी प्रसिद्ध असून परिसरात पाणलोट क्षेत्राचा विकास झाल्यामुळे जलसंधारणाची चांगली सोय आहे.

लोकजीवन

खेडलेझुंगे गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान आणि पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून द्राक्ष, ऊस, डाळिंब, कांदा, मका व हंगामी भाजीपाला अशी पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसोबतच काही कुटुंबे दुग्धव्यवसायातही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे सण-उत्सव गावाच्या एकतेचे दर्शन घडवतात. विशेषतः रामनवमी उत्सव व त्यानिमित्त भरवली जाणारी यात्रा / साप्ताह हे गावाचे वैशिष्ट्य आहे. तसेच गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र आणि स्थानिक देवतांच्या पूजांना मोठे महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व “अतिथी देवो भव” या भावनेने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे विशेषत्वाने जाणवतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

एकंदरीत, खेडलेझुंगेच्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबत आधुनिकतेची झलक दिसून येते. त्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता या दोन्ही गोष्टी सातत्याने जोपासल्या जातात.

लोकसंख्या

वर्ग संख्या
पुरुष १८७३
स्त्रिया १७४७
एकूण ३६२०

संस्कृती व परंपरा

खेडलेझुंगे गावाचे सांस्कृतिक जीवन समृद्ध आणि विविधतेने नटलेले आहे. येथे वर्षभर विविध धार्मिक, श्रावण सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विशेषतः रामनवमीला भरवली जाणारी तीन दिवसांची यात्रा ही गावाची प्रमुख ओळख आहे. या यात्रेतील रथ मिरवणूक हे प्रमुख आकर्षण मानले जाते. गावातील प्रमुख देवतांच्या पूजाअर्चा आणि सप्ताहामुळे ग्रामस्थांमध्ये एकोपा व श्रद्धेची भावना अधिक दृढ होते.

गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, होळी यांसारखे सण गावात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या सणांमुळे मुलं, तरुण आणि वयोवृद्ध सर्वच वयोगट एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करतात.

गावात लोककला, कीर्तन, भजन आणि पारंपरिक खेळांचा विशेष प्रभाव दिसून येतो. पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या परंपरा जपतानाच नवी पिढी आधुनिकतेशी जुळवून घेत आहे.

गावातील स्त्रियांचा सहभागही महत्त्वपूर्ण आहे. त्या ग्रामविकासाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेतात. स्वयंसहाय्य गटांद्वारे महिला सामाजिक व आर्थिक प्रगतीत योगदान देतात.

प्रेक्षणीय स्थळे

1. श्रीराम मंदिर – गावातील प्रमुख जागृत श्रीराम मंदिर हे गावकऱ्यांचे श्रद्धास्थान आहे. येथे दरवर्षी सप्ताहासारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

2. तुकाराम बाबा संस्थान व उंच मारुतीरायाची मूर्ती – गावाच्या पूर्व बाजूला सरोळ रोडजवळ असलेले हे धार्मिक स्थळ पंचक्रोशील संत जनांचे व वारकरी जनांचे भेटीगाठीचे केंद्र आहे. येथे भक्तांसाठी अध्यात्मिक शांतीचे वातावरण आहे.

3. शेती क्षेत्र व द्राक्ष/डाळिंब बागा – खेडलेझुंगे गाव द्राक्ष, ऊस व डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. गावातील हिरवीगार शेते, द्राक्षबागा आणि डाळिंबबागा पाहण्याजोगी असून पर्यटक व अभ्यासक यांचे आकर्षण ठरतात.

जवळची गावे

खेडलेझुंगे गाव निफाड तालुक्यातील पूर्व बाजूला, लासलगाव भागात स्थित आहे. या परिसरात आजूबाजूला अनेक गावे आहेत ज्यांच्याशी खेडलेझुंगे सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व सांस्कृतिक दृष्टीने जोडलेले आहे.

खेडलेझुंगेच्या आजूबाजूच्या प्रमुख गावांमध्ये कोलगाव, रुई, झुंगे ब्राह्मण पाडे, धरणगाव यांचा समावेश होतो. हे गाव खेडलेझुंगेशी जवळीक आणि परस्पर संवादामुळे एकत्रित ग्रामीण जीवनाचा अनुभव देतात.

ग्रामपंचायत प्रशासन


अ क्र नाव पद मोबाईल नं
सौ. माया विजय सदाफळ सरपंच ९४२०९०७७७७
श्री. विश्वनाथ रामभाऊ घोटेकर उपसरपंच ९२२६८८९९३८
श्री. अभिषेक सुरेश घोटेकर सदस्य ९९७०६६००८१
सौ. साकराबाई ज्ञानेश्वर बर्डे सदस्य ९७३०८६१५४६
सौ. सुनंदा आनंदराव घोटेकर सदस्य ९७३०१०७६०७
श्री. विठ्ठल चिमण बर्डे सदस्य -
श्री. नारायण एकनाथ सदाफळ सदस्य ९८३४९७७७७४
सौ. जयश्री धर्मराज घोटेकर सदस्य ९७६३४२५४११
सौ. संगीता बळीराम माळी सदस्य ९६७३०८२०५२
१० श्री. विजय काशिनाथ गीते सदस्य ९८५०२६५७९९
११ सौ. कल्पना रामदास गोरडे सदस्य ९८२३४४३७९१

लोकसंख्या आकडेवारी


२०६
३६२०
१८७३
१७४७
Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11
Logo 12